पाउस कधीचा पडतो झाडांचि हलति पाने
हलकेच जाग मज आली दु:खाच्या मंद
सुराने डोळयात ऊतरले पाणी पाण्यावर डोळे फिरती
रक्ताचा उडाला पारा या नितळ उतरणीवरती
पेटून कशी उजळेन हि शुभ्र फुलांचि ज्वाला
तार्यांच्या प्रहारापाशी पाउस असा कोसळला
सन्दिग्ध घरांच्या ओळी आकाश ढवळतो वारा
माझ्याच किनारयावरती लाटांचा आज पहारा