Wednesday, August 27, 2008

ऐसा काही न हो के पलटकर न आ सकू....

शोला था जल बुज़ा हु, हवाए मुझे न दो
मै कबका जा चूका हु सदाए मुझे न दो

जो जहर पी चूका हु तुम्ही ने मुझे दिया है
अब तुम तो जिंदगी की दुवाए मुझे न दो

ऐसा काही न हो के पलटकर न आ सकू
हर बार दूर जाके सदाए मुझे न दो

कब मुझको ऐतराफ़ ऐ मुहब्बत न था 'फराज'
कब मैंने ये कहा था सजाये मुझे न दो...
.....
अहमद फ़राज़ वारले। 'रंजिश ही सही दिल ही दुखाने के लिए आ' असे आर्जव करताना कातिल शायरी काय असते हे सांगणारा शायर गेला। खरे तर या जगप्रसिध्द गज़लचा हा शेर अहमद फराज यांनाही आता लागू होतो.
.....
' ऐसा काही न हो के पलटकर न आ सकू
हर बार दूर जाके सदाए मुझे न दो'...

मेहदी हसन यांचे गायन आणि फराज यांची शायरी यांचे असे काही दर्दभरे मिश्रण आहे की थोडा मनाचा जागा माणूस अस्वस्थ झालाच पाहिजे। एकटी 'रंजिश' जरी ऐकली तरी पेन आणि सूर काय करू शकतात ते दिसून येते.अहमद फराज गेले. ते काही राजकीय नेते नव्हते. पण शायरीवर प्रेम करणारा प्रत्येक माणूस त्यांच्याशी एक धाग्याने बांधला गेला होता. गझल अशीच कधी तरी अचानक कानावर पडली आणि हे प्रकरण मनाला भावले. अम्मल चढावा तशी गझल मनावर राज्य करू लागली. मेहदी हसन, गुलाम अली केव्हा मानत घर करूँ बसले ते समजलेही नाही. त्यांच्या सोबत अहमद फराज असेच आले. आणि खुशाल रहू लागले.गझल हा प्रकार समुद्रसारखा आहे. जितके खोल खोल जाल तितकी अनुभूति तीव्र होत गेली.

मेहदी हसन ऐकता ऐकता अहमद फराज समजत गेले। त्यांच्या एक एक गझल वाचल्या तरी त्यांची ताकद लक्षात येते.....
आँख से दूर न हो, दिल से उतर जायेगा
वक्त का क्या है, गुजरता है गुजर जायेगा॥
अशा साध्या सोप्या शब्दातील गझल असो की रंजिश ही सही असो..सारे कसे थेट आणि स्पष्ट.फिर उसी राह गुजर पर शायदहम कभी मिल सके शायद हे लिहितानाची हतबलता प्रत्येकाने पाहिलेली. आयुष्यात कधी न कधी अनुभवलेली. फ़क्त ती लिहिली अहमद फराज यांनी.प्रत्येकाच्या मनाची अवस्था लिहिणारा हा शायर फ़क्त शब्दांचे खेळ करीत बसला नाही. त्यात त्याने भावना ओतल्या. त्यातून मनाच्या जखमांवर फुंकर घालणारी शायरी जन्माला आली. हा शायर स्वत:बद्दल तेवढ्याच आत्मियतेने लिहून गेला.
मै तो आवारा शायर हु, मेरी क्या वकात?
एक दो गीत परेशां से गा लेता हु..
असे ते स्वत:बद्दल सांगतात, पण खरे तर त्यांच्या शायारिने श्रोताच परेशां झालेला असतो..किंवा आयुष्यात परेशां झालेला त्या गझलेत स्वत:ला पाहतो.
आपल्यासाठी परेशां करणारे काही लिहिणार नाहीत....सोबत कायम राहतील त्यांचे शेर. घायाळ करणारी त्यांची ग़ज़ल....'रंजिश ही सही' ऐकत पुन्हा पुन्हा त्याच जखमांवर फुंकर घालायची. नेहमी.

2 comments:

आशा जोगळेकर said...

Sunder . Marathi manoos an Shayaree cha itak shauk. Chan watal.

Yogesh Patil said...

Tusi juz gr8 ho :)