Saturday, February 14, 2009

मेहदी हसन- भाग-1


१९२७. तेव्हा भारत आणि पाकिस्तान वेगळे व्हायचे होते. राजस्थानमधील एक संस्थानात राजाच्या दरबारी उस्ताद अजीम खान आणि उस्ताद इस्माईल खान हे दोन शास्त्रीय गायक होते. दरबारात गायकी सादर करणारे हे दोन बंधू आपल्या घरी एक चिमुरड्या मुलाला शास्त्रीय संगीताचे शिक्षण देत होते. त्याच्या कोवळ्या गळ्यातुन सुरांचे विश्व साकारले जात होते. त्या मुलाचे नाव होते मेहदी हसन.
राजस्थानात लुना हे त्यांचे गाव। लहानगा मेहदी तिथेच ठुमरी, ध्रुपद, ख्याल गायकी शिकला. वय वर्षे ८ हे तसे खेळ्ण्याचे. पण मेहदी सुरा सोबत खेळत बसायचा. बालपण संपले. नेमकी भारताची फ़ाळणी झाली. हसन कुटुंब पाकिस्तानात गेले. नवा देश, नवी माणसे. खिशात पैसे नाहीत. गान्याशिवाय दूसरी कला नाही. मेहदी ने मग सायकलचे दूकान टाकले. घर चालावे यासाठी कार आणि ट्रक्टर दुरुस्तीचे काम शिकला. पण गायन आणि त्याचे शिक्षण सुरूच होते. संगीताला मेहदी ने कधी अंतर दिले नाही. रियाज़ सुरूच असे. करियर करायचे तर संगीतात हे त्याने पक्के ठरवले होते. १९५२ साली रेडियो पाकिस्तान वर त्याला संधि मिळाली. तिथून त्याचे नाव झाले. उस्ताद बरकत अली खान, बेगम अख्तर, मुख्तार अख्तर हे दिग्गज त्याचे आदर्श होते. उर्दूची नजाकत आणि गझल प्रकारात असलेला रस यामुळे मेहदी हसनने मग या गझलेवरच भरभरून प्रेम केले. १९५२ ते १९६० या काळात मेहदी हसनने गजह्ल गायकीवर प्रभुत्व मिळवले. आणि गझल गायनाच्या क्षेत्रात एक नव्या पर्वाचा प्रारंभ झाला. ६० आणि ७० ही दशके फ़क्त मेहदी हसन यांचीच होती. या २० वर्षात त्यांनी चित्रपटातील गाणीही गायली. त्या काळातील असा एखादाच पाकिस्तानी हीरो असेल ज्याला मेहदी हसन यांचा आवाज नव्हता.

...............................

भाग 2 लवकरच येत आहे...
...........................

2 comments:

Kamini Phadnis Kembhavi said...

मन चकव्याचे फूल वरच्या अभिप्रायासाठी मन:पूर्वक धन्यवाद.
बाय द वे. गझल चे काय ? >> हे कोणत्या गझलबद्दल विचारत होतात आपण? समजले नाही

Kamini Phadnis Kembhavi said...

ओह! :) धन्यवाद..नाही सध्या तरी एवढ्याच! गझल पूर्ण झाल्या Blog वर पोस्ट करेनच.
तुम्ही औरंगाबदला असता का? कारण सध्या मीही औरंगाबादमधेच आहे आणि गझल वा कवितांच्या संदर्भात इथे चर्चा करण्यासाठी माझी कोणाशी ओळख नाहीये. तुम्ही एखादा ग्रुप किंवा तत्सम मंड्ळ वगैरे काही सुचवलत तर माझ्यासाठी बरं होईल.